Join us  

मुंबई, ठाणे आणि कल्याणकरांचे प्रदूषणाने हाल 

By सचिन लुंगसे | Published: December 29, 2023 6:07 PM

फॉग मशीन किंवा स्मॉग टॉवरचा किंवा पाऊस पाडण्याचा प्रयोग करणे हे अतिशय महागडे आहे.

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सेवा सुविधांची कामे, वेगाने उभ्या राहत असलेल्या गगनचुंबी इमारती, सातत्याने वाढणाऱ्या वाहनांची संख्या आणि रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटच्या प्रदूषणाने मुंबईकरांचे २०२३ हे वर्ष धुळीने माखले. रस्त्यांच्या कामांसह इमारतींच्या कामांनी यात अधिक भर घातली आणि उन्हाळ्यासह हिवाळ्यातील अधिकाधिक दिवस मुंबईत नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणाने मुंबईकरांचा श्वास आजही कोंडल्याचे चित्र आहे. फॉग मशीन किंवा स्मॉग टॉवरचा किंवा पाऊस पाडण्याचा प्रयोग करणे हे अतिशय महागडे आहे. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रदूषण आढळते. हिवाळ्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनी जवळ येत. वाऱ्याची गतीसुद्धा अगदी कमी असते. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असते. - प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी प्रदूषणाची कारणेवाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि इतर उद्योग उपायझाडे लावणे, सायकलचा व सार्वजनिक वाहने वापरणे, बॅटरीवर चालणारी वाहने उपयोगात आणणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा जाळू नये. कल्याण३६५ दिवसांपैकी २१९ दिवस जास्त प्रदूषण६ दिवस चांगले१४९ दिवस समाधानकारक१८८ दिवस साधारण प्रदूषित३० दिवस जास्त प्रदूषित१ दिवस अत्यंत प्रदूषित ठाणे३६५ पैकी २५२ दिवस जास्त प्रदूषण४२ दिवस चांगले७१ दिवस समाधानकारक२११ दिवस साधारण प्रदूषण४१ दिवस जास्त प्रदूषित मुंबई३६५ पैकी १९४ दिवस प्रदूषण२ दिवस चांगले१६९ दिवस समाधानकारक१५६ दिवस साधारण प्रदूषण३७ दिवस जास्त प्रदूषित१ दिवस अत्यंत प्रदूषण नवी मुंबई३६५ पैकी २०२ दिवस प्रदूषण६२ दिवस चांगले१०१ दिवस समाधानकारक११४ दिवस साधारण प्रदूषण६८ दिवस जास्त प्रदूषण१६ दिवस अत्यंत प्रदूषण३ दिवस घातक प्रदूषण 

टॅग्स :मुंबईप्रदूषण