Join us  

प्रदूषणात मुंबई दिल्लीच्या मार्गावर, धूरक्याने मुंबईकरांच्या आणले नाकी नऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:59 AM

‘ओखी’ चक्रिवादळाचा तडाखा, पडलेला अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरित परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ओखी’ चक्रिवादळाचा तडाखा, पडलेला अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरित परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. शनिवारी दिवसभर मुंबईवर धूरक्याची नोंद कायम असतानाच, मुंबईकरांचा रविवारही धूरक्यातच गेला. विशेषत: धूरक्याचे प्रमाण कायम राहिल्याने मुंबईतल्या हवेचा दर्जा घसरला असतानाच, आता दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबईची दिल्ली झाल्याची...’ भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रदूषणाबाबत मुंबई आणि दिल्लीची तुलना करणे योग्य नसल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे असले, तरीदेखील मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाल्याच्या वृत्ताला संबंधितांना दुजोरा देत, भीती वाढल्याची प्रतिक्रिया दिली आहे.शनिवारपासूनच मुंबईच्या धूरक्यात वाढ नोंदविण्यात येत आहे. प्रदूषण, वातावरणातील वाढते धूलिकण, अशा अनेक घटकांमुळे वातावरण प्रदूषित होत आहे. यात वाढते धुके आणि धूळ यांच्या मिश्रणामुळे धूरक्यात भर पडते आहे. याचाच विपरित परिणाम म्हणून धूरके कमी होण्याऐवजी वाढत आहे. दिल्लीचा विचार करता, दिल्ली येथील वाहनांचे प्रदूषणाचे प्रमाण करण्यासाठी वाहनांबाबत सम-विषमचा प्रयोग राबविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र, त्याचा फारसा काही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मुंबईतली वाढती बांधकामे, वाहनांची वाढती लोकसंख्या प्रदूषणात भर घालत असून, याबाबत वेळीच उपाय योजले नाहीत, तर मात्र भविष्यात परिस्थिती गंभीर निर्माण होऊ शकते, असेही पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.दिल्ली होणे कठीण, परंतु परिस्थती गंभीरथंडीत धुके पसरणे ही नवी बाब नाही, परंतु या वेळी त्याचे प्रमाण अधिक आहे. धूरक्याचे प्रमाण वाढण्यामागे चार वेगवेगळी कारणे आहेत. त्यापैकी ‘ओखी’ वादळाचे निमित्त त्यास कारणीभूत ठरले आहे, तसेच पावसामुळे मुंबईवर ढग आल्याने सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईत वारे वाहने बंद झाले आहे आणि चौथे कारण म्हणजे मुंबईतील प्रदूषण आणि बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिस्थती गंभीर झाली आहे. मात्र, मुंबईची परिस्थती दिल्लीसारखी होणे शक्य नाही. मुंबई हेसमुद्राजवळचे शहर आहे. त्यामुळे अशा समस्या मुंबईला फार जाणवत नाहीत. समुद्राकडून वाहणारे वारे सुरू झाल्यानंतर परिस्थती सुधारेल.- सुलक्षणा महाजन, शहर नियोजन तज्ज्ञमुंबईची परिस्थती दिल्लीहून बरीमुंबईत दिल्लीच्या तुलनेने कमी प्रदूषण होते. मुंबईला जवळच समुद्र आहे. समुद्राकडून वाहणाºया वाºयांचा मुंबईला फायदा होतो. मुंबईत सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यास फक्त प्रदूषण जबाबदार नाही, तर ‘ओखी’ चक्रिवादळ, ढगाळ वातावरण, समुद्राकडून वाहणारे वारे थांबणे ही कारणेसुद्धा महत्त्वाची आहेत. फक्त प्रदूषणामुळेच धूरके पसरले असते, तर ते धूरके मुंबईतील जंगलांमध्ये पसरले नसते. मी मागील दोन दिवसांत संजय गांधी राष्टÑीय उद्यान, तुळशी तलाव येथील जंगली भागातून फिरलो. धूरक्याची जी परिस्थती मला शहरात आणि उपनगरांत दिसली, तशीच परिस्थिती मला जंगलांमध्येसुद्धा पाहायला मिळाली. यावरून धूरके पसरण्यामागे फक्त प्रदूषण नसून, येथील नैसर्गिक बदलही कारणीभूत आहेत. - परविश पांड्या, पर्यावरणतज्ज्ञ1शनिवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरावरील धूरक्याचे प्रमाण कायम होते. मुंबई शहरात फोर्ट, नरिमन पॉइंट, गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, माहिम, दादर, सायन, कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगावसह मुलुंड आणि मुंबईच्या आसपासच्या प्रदेशात रविवारी धूरक्याची नोंद कायम राहिली.2मुंबईकरांची रविवारची पहाटच धूरक्याने झाली. धूळ, धूके आणि वातावरणातील उर्वरित घटक एकमेकांत मिसळल्याने, शहरावर निर्माण झालेल्या धूरक्याने मुंबईच्या नाकी नऊ आणले. सोमवारीही असेच चित्र कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविल्याने, मुंबईकरांना आणखी एक दिवस धूरक्याला समोरे जावे लागणार आहे.3सफरच्या नोंदीनुसार, मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला असून, अंधेरी, बोरीवली, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथील वातावरणात सर्वाधिक धूरक असल्याची नोंद झाली.उपाय शोधणे गरजेचेमुंबईतल्या आजच्या परिस्थितीला निसर्गाइतकाच मानवही जबाबदार आहे. आपणच येथील जंगले नष्ट केली, मुंबईत सर्वत्र बांधकामे होत आहेत. त्यामुळे हवेमध्ये धुळीचे प्रमाण वाढत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता मेट्रोच्या भुयारी कामांसाठी सर्वत्र खोदकाम चालू आहे. हवेत धुळीचे प्रमाण वाढण्यास हे कारणीभूत आहे. त्याचबरोबर, प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. शासकीय अधिकारी आणि हवामान, पर्यावरणतज्ज्ञांनी एकत्र येत, या सर्व समस्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहे.- राजकुमार शर्मा, पर्यावरणतज्ज्ञबोध घ्यायला हवामहापालिका आणि राज्य शासनाने दिल्ली आणि कोलकात्याच्या परिस्थतीतून बोध घ्यायला हवा. मुंबईत धुके आणि धुळीचे प्रमाण वाढत आहे. बांधकाम आणि खोदकामांमुळे त्यात दिवसागणिक भर पडत आहे. मुंबईतल्या परिस्थितीला मुंबईकर आणि स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे योग्य यंत्रणा नाही. आपण मुंबईतली जंगले नष्ट करत आहोत. कांदळवनांचा ºहास होत आहे. मुंबईकरांना याबाबत सांगून समजत नाही, आता भोगल्यानंतर तरी परिस्थितीचे गांभीर्य समजेल.- डी. स्टॅलिन,प्रकल्प संचालक, वनशक्ती

टॅग्स :मुंबईप्रदूषण