Join us  

मुंबईत रविवारीही धूरके कायम, मुंबईतल्या हवेचा दर्जा घसरला; कमाल आणि किमान तापमानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:12 AM

‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरीत परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अरबी समुद्रासह शहराच्या आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ, या सर्व घटकांचा विपरीत परिणाम म्हणून वाढलेले धुके आणि धूळ यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. शनिवारी दिवसभर मुंबईवर धूरक्याची नोंद कायम असतानाच मुंबईकरांचा रविवारही धूरक्यातच गेला. विशेषत: धूरक्याचे प्रमाण कायम राहिल्याने, मुंबईतल्या हवेचा दर्जा घसरला होता.शनिवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरावरील धूरक्याचे प्रमाण कायम होते. मुंबई शहरात फोर्ट, नरिमन पॉइंट, गिरगाव, लालबाग, परळ, वरळी, माहिम, दादर, सायन, कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगावसह मुलुंड व मुंबईच्या आसपासच्या परिसरात रविवारी धूरक्याची नोंद कायम राहिली.1मुंबईकरांची रविवारची पहाटच धूरक्याने झाली. सोमवारीही असेच चित्र कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविल्याने, मुंबईकरांना आणखी एक दिवस धूरक्याला सामोरे जावे लागणार आहे.१२ डिसेंबरपर्यंत कोकण-गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १३ डिसेंबर रोजी विदर्भात पाऊस पडेल. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.2सफरच्या नोंदीनुसार, मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला असून, अंधेरी, बोरीवली, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल येथील वातावरणात सर्वाधिक धूरके असल्याची नोंद झाली आहे.किमान तापमान २० अंशमुंबई शहराच्या कमाल आणि किमान तापमानात नोंदविण्यात येत असलेली घट कायम आहे. मुंबईचे किमान तापमान २० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, सोमवारसह मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या प्रमुख शहरांमध्येही किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईप्रदूषण