Join us

बंद असलेली बाभई स्मशान भूमी सुरू करा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बसल्या उपोषणाला

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 23, 2024 23:21 IST

Mumbai: बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत आणि अँड. कपिल सोनी, सारिका सावंत, विनोद पंदेरे, गणेश कोरुडे, यदुनाथ प्रजापती, भावी ठकार, नितीन डिसिल्वा आदी कार्यकर्त्यांनी आज सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्यालयावर अमरण भूक हारताळ आंदोलन सुरू केले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - बोरिवली पश्चिम बाभई येथील स्मशानभूमी गेल्या ऑक्टोबर पासून बंदच आहे. बंद असलेली बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत आणि अँड. कपिल सोनी, सारिका सावंत, विनोद पंदेरे, गणेश कोरुडे, यदुनाथ प्रजापती, भावी ठकार, नितीन डिसिल्वा आदी कार्यकर्त्यांनी आज सकाळ पासून पालिकेच्या आर मध्य कार्यालयावर अमरण भूक हारताळ आंदोलन सुरू केले आहे.

येथील स्मशानभूमी बंद असल्याने बोरीवलीकरांना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील बाभई येथील गॅसच्या स्मशानभूमीवर जावे लागते.यामध्ये शोकाकूल कुटुंबाला अंत्यसंस्कार होण्यासाठी तात्कळत थांबावे लागते.आपण या संदर्भात पालिकेने वारंवार तक्रारी केल्या,मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जर येत्या १० दिवसात सदर स्मशानभूमी सुरू केली नाही तर पालिकेच्या आर मध्य विभाग कार्यालयावर आपण भूक हारताळ करणार असल्याचा इशारा येथील ८० वर्षीय सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी येथील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांना एका पत्राद्वारे दिला होता.या संदर्भात लोकमतच्या दि, 7 जुलैच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते.

अखेर बाभई स्मशानभूमीच्या कामाचे झाले होते भूमीपूजनचोगले कुटुंबाची शेकडो वर्षा पासूनची ही हिंदू स्मशानभूमी असून नागरिकांच्या सोयीसाठी  सदर जागा पालिकेला वापरायला दिली.गेल्या ऑक्टोबर मध्ये पालिकेने सदर स्मशानभूमी मोडकळीस आली म्हणून बंद केली होती. जनतेच्या आणि समाजाच्या भावनांचा आदर करून आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन स्थानिक भाजप आमदार सुनील राणे यांनी महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा आणि निवेदन देऊन तातडीने सदर स्मशानभूमीच्या दुरुस्तीची आणि सुशोभीकरणाची मान्यता आणली.दि, ७ जूलै रोजीसकाळी सदर स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन आमदार सुनील राणे तसेच चोगले बंधू यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

मात्र सदर पालिकेचे नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे.काम कधी पूर्ण होईल याचे आश्वासन सहाय्यक आयुक्त नांदेडकर आणि त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपण वारंवार पत्रव्यवहार करून दिलेले नाही.बाभई स्मशान भूमीची एक तरी चिता सुरू करा या मागणीसाठी आपण आजपासून आमरण भूक हरताळ उपोषण सुरू केल्याची माहिती मीरा कामत यांनी दिली.

पालिकेची भूमिका काय

या संदर्भात सहाय्यक आयुक्त नांदेडकर यांनी सांगितले की,मीरा कामत यांचा असा हट्टाआस व पालिकेला वेठीस धरणे योग्य नाही.कोणाच्या सांगण्यावरून किंवा राजकीय हेतूने त्यांचे आंदोलन सुरू आहे.म्हाडाच्या कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. सध्या पाऊस असल्याने कामात व्यतय होतो.पूर्ण काम सुरू झाल्या शिवाय आणि संबंधित ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सदर स्मशानभूमी सुरू करणे शक्य नाही.कांम पूर्ण झाल्यावर स्मशानभूमी पालिका सुरच करणार आहे.आमचे अधिकारी आधी त्यांच्या घरी गेले,त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना माझ्या दालनात चर्चे साठी बोलावले, पण त्या यायला तयार नाही.आता आमच्या संबधीत स्टाफला देखिल रात्रभर येथे थांबावे लागत आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका