Join us  

मुंबई पुन्हा उभी राहतेय, कोस्टल रोड प्रकल्पासाठी पुन्हा मशीन धडाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:35 AM

मात्र जुलै २०१९ पासून आतापर्यंत या प्रकल्पाचे केवळ दहा टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढच्या आठवड्यात बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून मजूर आल्यावर या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू होणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात थंडावलेल्या मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासाठी पुन्हा मशीन धडाडणार आहेत. चीनमधून आणलेली तब्बल २२०० टन वजनाची महाकाय टनेल मशीन कामाच्या ठिकाणी दाखल झाली आहे. मात्र जुलै २०१९ पासून आतापर्यंत या प्रकल्पाचे केवळ दहा टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढच्या आठवड्यात बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून मजूर आल्यावर या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू होणार आहे.प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळीकडील टोक यादरम्यान ९.९८ किलोेमीटरचा सागरी रस्ता महापालिकेमार्फत बांधण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात हे काम रखडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने याबाबत परिपत्रक काढून कामगारांना सूचित केले होते. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी लागणारी सामग्री, भरावाचे ट्रक, डंपर, मिक्सर, कामगार यांना बंदी आदेशातून वगळण्यात आले होते. मात्र कामगार आणि सामग्री येत नसल्याने कोस्टल रोडचे काम काही काळ ठप्प झाले होते. मात्र ‘पुन:श्च हरिओम’अंतर्गत मुंबईची गाडी रुळावर येत असताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हळूहळू सुरू होत आहे. सध्या पायलिंग, काँक्रिटीकरण, भराव टाकण्याचे काम सुरू आहे.।कोस्टल रोडच्या मार्गातील अडथळेमुंबईकरांचा प्रवास सुसाट करणार १३ हजार कोटींच्या ‘कोस्टल रोड’चे काम पालिकेच्या माध्यमातून १३ आॅक्टोबर २०१८ रोजी सुरू करण्यात आले. मात्र न्यायालयीन प्रक्रियांमुळे हे काम काही काळ बंद होते. १७ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली. त्यामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेले काम १८ डिसेंबर २०१९ पासून पुन्हा सुरू झाले. परंतु लॉकडाऊनच्या काळात मार्च २०२० पासून पुन्हा या कामाला ब्रेक लागला.>असे सुरू आहे कामसध्या या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या चारशेपैकी एका मजुराला कोरोनाची लागण झाली होती. याची लागण अन्य मजुरांना होऊ नये, यासाठी कामगार, अधिकारी कामावर येताना व जाताना त्यांची नियमित थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. तसेच मजुरांना मास्क, हँडग्लोव्हजसह, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. मजूर राहणाºया ठिकाणाहून त्यांना आणण्यासाठी आणि काम संपल्यावर त्यांना घरी पोहोचवण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.>असे आहे कामाचे स्वरूपकोस्टल रोडच्या कामासाठी आणलेली दीडशे कोटी किमतीची टनेल मशीन ८० मीटर लांब, २२०० टन वजनाची आहे. ही मशीन बसवण्यासाठी २० मीटर खोल ‘हार्ड रॉक’ खोदावे लागत आहेत. तसेच मशीन उतरवण्यासाठी ‘८० बाय ४० मीटर’ जागा तयार करावी लागत आहे. पाया तयार केल्यानंतर १ आॅगस्टपासून मशीन उतरवायला सुरुवात केली जाईल. आॅक्टोबरपासून या मशीनच्या साहाय्याने प्रत्यक्ष बोगदा खोदायचे काम सुरू करण्यात येणार आहे.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्रिंन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतचा ९.९८ कि.मी.चा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे.कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वेळेची बचत ७० टक्के तर प्रतिवर्षी इंधनाची बचत ३४ टक्के होईल.टोलमुक्त आणि विनाअडथळा प्रवासासह ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.