Join us  

स्वच्छतेच्या यादीत मुंबईची पिछेहाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:13 PM

आंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले.

- शेफाली परब-पंडितआंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले. स्वच्छता मोहिमेत महापालिकेची मोठी यंत्रणा राबत असताना ही पीछेहाट का? याबाबत स्वच्छता मोहिमेचे विशेष अधिकारी व सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी केलेली बातचित.प्रश्न : स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेची सातत्याने घसरण का?उत्तर : आंतरराष्ट्रीय शहरांशी मुंबईची तुलना होते. दीड कोटींच्या लोकसंख्येचा व्यापही मोठा आहे. त्यामुळे येथील आव्हाने वेगळी असल्याने, केवळ १५लाख लोकसंख्या असलेल्या इंदौर शहराशी मुंबईची तुलना होऊ शकत नाही. या वर्षी केंद्राच्या निकषांमध्ये बराच बदल करण्यात आला होता. कचरा उचलण्याचा अधिभार महापालिका मुंबईकरांकडून वसूल करीत नाही. म्हणून केंद्राने थ्री स्टार रेटिंग नाकारले. तिथेच मुंबईचे १,२५० पैकी ४५० गुण कमी झाले. नागरिकांकडून सकारात्मक मतदानाचे प्रमाणही या वर्षी इतर शहरांच्या तुलनेत फार कमी म्हणजे केवळ ६५% होते.प्रश्न : मुंबईकरांनी मतदान न करण्याचे कारण काय?उत्तर : आर्थिक राजधानी असलेल्या या शहराकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. कदाचित, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात किंवा केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. यापुढे नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींच्या निवारणावर अधिक भर देण्यात येईल.प्रश्न - पुढच्या वर्षासाठी काय तयारी असेल?मुंबई हे अनियोजित शहर आहे. येथे ५२ टक्के लोकवस्ती झोपडपट्टीत राहते. सांडपाण्यासाठी ७० टक्के ठिकाणी स्वतंत्र मलनिस्सारण वाहिन्या नाहीत. सर्वाधिक कचरा (दररोज सुमारे नऊ हजार मेट्रिक) निर्माण करणारे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. त्यामुळे मुंबईसमोरील आव्हानेही इतर शहरांपेक्षा वेगळी आहेत. आम्ही स्पष्टीकरण देत नाही. वेळ पडल्यास स्वच्छतेसाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. मुंबईच्या स्वच्छतेसाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील.प्रश्न - नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत?स्वच्छता ही टू वे प्रोसेस आहे. आम्ही फेकणार, तुम्ही उचला असे होऊ शकत नाही. पर्यावरणाला वाचविण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मुंबईकरांनीही सवयींमध्ये बदल घडवून आम्हाला सहकार्य दिल्यास स्वच्छतेची मोहीम यशस्वी ठरेल.

मुंबई हे अनियोजित शहर आहे. येथे ५२ टक्के लोकवस्ती झोपडपट्टीत राहते. सांडपाण्यासाठी ७० टक्के ठिकाणी स्वतंत्र मलनिस्सारण वाहिन्या नाहीत. मुंबईसमोरील आव्हानेही इतर शहरांपेक्षा वेगळी आहेत.- किरण दिघावकर

टॅग्स :मुंबईस्वच्छ भारत अभियान