Join us  

मुंबईत दूषित चायनिज पदार्थांची विक्री सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:35 AM

शिवडी येथे रोगट आणि निकृष्ट दर्जाचे चिकन चायनिज गाड्यांना पुरवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर नुकतेच उघडकीस आले. मात्र त्यानंतर आठवड्याभरात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजही मुंबईतील चायनिज गाड्यांवर सर्रासपणे दूषित खाद्यपदार्थ विकले जात आहे.

मुंबई : शिवडी येथे रोगट आणि निकृष्ट दर्जाचे चिकन चायनिज गाड्यांना पुरवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर नुकतेच उघडकीस आले. मात्र त्यानंतर आठवड्याभरात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आजही मुंबईतील चायनिज गाड्यांवर सर्रासपणे दूषित खाद्यपदार्थ विकले जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये समोर आले आहे.काहीच दिवसांपूर्वी शहापूरमधील खर्डी येथे चायनिज खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने तीस जणांना विषबाधा झाली होती. शिवडी येथील कारवाईनंतर धोकादायक चिकन विकणाऱ्या चायनिज गाड्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या गाड्या सर्रास सुरू आहेत. याशिवाय या गाड्यांवर बंदी असलेल्या ‘अजिनोमोटो’चा वापर, बेकायदेशीरपणे जागा बळकावणे आणि सुरक्षेकडे सपशेल दुर्लक्ष अशा गंभीर बाबीही समोर आल्या आहेत. दरम्यान, चायनिजच्या गाड्या चालविताना त्यास महापालिकेचा परवाना आहे की नाही, याबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहते. अशा वेळी स्थानिकांना त्रास होतो. याविरोधात महापालिका, पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत.विठ्ठलराव यादव चौक,लोअर परळचौकातील पदपथ काबीज करून सर्रासपणे चायनिज गाडी लावण्यात आली आहे.चायनिज तयार करण्यासाठी सिलिंडरचा नियमबाह्यपणे वापर केला जात आहे.इलेक्ट्रिक केबिनजवळच स्टोव्ह लावण्यात आला होता.चायनिज पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर केला जातो.खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणाºया प्लेट एक अल्पवयीन मुलगा रस्त्यालगतच विसळण्याचे काम करत होता.प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही या ठिकाणी मांस प्लॅस्टिक पिशव्यांत ठेवण्यात आले होते.कॉटनग्रीन, काळाचौकी, श्रावण यशवंते चौकश्रावण यशवंते चौक बसस्टॉपमागे बिनदिक्कत बेकायदेशीर चायनिज गाडी सुरू आहे.चायनिज खाण्यासह या ठिकाणी मद्यपानही सुरू होते.अजिनोमोटोचा वापर खाण्यात केला जातो.रस्त्याशेजारी सिलिंडरचा नियमबाह्यपणे वापर केला जात आहे.विभागातील दुकाने दहा वाजता बंद होत असताना सदर गाडी रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येते.मालाड पूर्वेकडील आपापाडा येथील चायनिज सेंटरचायनिज सेंटर दुपारपासून सुरू होते, ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असते.खाद्यपदार्थ दुकानाच्या बाहेर बनविले जात असून सर्व पदार्थ उघड्यावर ठेवण्यात आले होते.अल्पवयीन मुलाला कामासाठी ठेवण्यात आले होते.चायनिज सेंटरमध्ये दोन खोल्या असून आतील खोलीमध्ये मद्यपींसाठी व्यवस्था होती.बाहेरील जागेतही काही तरुण मद्यासोबत चायनिजचा आस्वाद घेत होते.पार्सल देताना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात होता.कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळकनगर या स्थानकांच्या मध्य भागावरील चायनिज सेंटरटिळकनगर स्थानकाच्या बाजूला असलेल्या चायनिज गाडीवरील पदार्थ उघड्यावर असतात.अस्वच्छ पाण्यात भांडीधुतली जातात.सिलिंडरचा नियमबाह्यपणे वापरचायनिज गाड्या रात्री १२ वाजेपर्यंत सुरूसेंटरच्या बाजूलाच मोठे गटार वाहतआहे.प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही त्यांचा वापर होतो.खुलेआम मद्यपान केले जाते.चायनिज बनविण्याच्या जागेवर अस्वच्छता दिसून येते.अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते.गटार असल्यामुळे परिसर अस्वच्छ आहे.परिसरात गटारामुळे दुर्गंधी पसरली आहे.आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.संकलन : चेतन ननावरे, सागर नेवरेकर, कुलदीप घायवट

टॅग्स :अन्नमुंबई