Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली मुंबई...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:07 IST

फोटो आहे - दहिसर-------------------शिवसेना शाखा क्रमांक २०६ तर्फे शिवडी नाका टी. जे. रोड येथे मदत फेरी काढण्यात ...

फोटो आहे - दहिसर

-------------------

शिवसेना शाखा क्रमांक २०६ तर्फे शिवडी नाका टी. जे. रोड येथे मदत फेरी काढण्यात आली होती. यावेळी ८० वर्षांच्या आजीने चाळीस वर्षे मडकी विकून आलेल्या पैशातून पूरग्रस्तांसाठी बिस्किटाचे पुडे दिले. या घटनेमुळे आजीने अनोख्या माणुसकीची ओळख करून दिल्याची चर्चा दिवसभर होत होती.

फोटो आहे - आजी

----------------

पूरग्रस्तांसाठी शिवसेना शाखा क्र. ५४ व शिवप्रेमी प्रतिष्ठानच्यावतीने आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मदत घेऊन ट्रक कोकणाकडे रवाना झाला. यावेळी सिनेकलाकार जयवंत वाडकर, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अजित भोगले, युवा सेना विधानसभा समन्वयक अमोल अपरात, सरचिटणीस अनिल दळवी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो आहे - गिरगाव

-----------------

पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी संघर्ष नगर चांदिवली येथील संकल्प सिद्धी संघाने मदतीचा हात पुढे केला आहे. जीवनावश्यक वस्तूंसह स्वच्छतेसाठी लागणाऱ्या गोष्टी रवाना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही राजकीय सहभागाविना केवळ स्थानिकांनी दिलेल्या देणग्यांतून तरुणांनी ही सर्व सामग्री जमा केली आहे.

फोटो आहे - चांदिवली