Join us

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे लँडिगवेळी विमानाची चाकं रुतली चिखलात, प्रवासी सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 22:51 IST

मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई विमानाची चाकं चिखलात रुतली असून प्रवासी विमानात अडकले आहेत. विमानातील 183 प्रवाशी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत.

मुंबई, दि. 19 : मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई विमानाची चाकं चिखलात रुतली असून प्रवासी विमानात अडकले आहेत. विमानातील 183 प्रवाशी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

मुंबईसह उपनगरात पावसाने आज झोडपले त्यामुळे मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात  अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसेच, लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. याशिवाय, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा पाणी साचल्यामुळे विमानसेवेवरही याचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर पाणी साचाल्यामुळे आणि खराब हवामानामुळे अद्याप एकाही विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे सांगण्यात येते. तसेच, चार विमाने वळविण्यात आली असल्याची माहिती सीएसआयएच्या अधिका-यांकडून मिळते.