Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांचे होणार ‘हेल्थ पेट्रोलिंग’

By admin | Updated: September 2, 2015 03:09 IST

कामाचा वाढता ताण, वेळी अवेळी जेवण, अपुरे मनुष्यबळ, अवेळी असलेले ड्युटीचे तास अशात सणादरम्यान असलेल्या बंदोबस्ताच्या अतिरिक्त ताणामुळे

मुंबई : कामाचा वाढता ताण, वेळी अवेळी जेवण, अपुरे मनुष्यबळ, अवेळी असलेले ड्युटीचे तास अशात सणादरम्यान असलेल्या बंदोबस्ताच्या अतिरिक्त ताणामुळे यात भर पडून पोलिसांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होताना दिसतो. मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या हेल्थ पेट्रोलिंगचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडणार आहे.या संदर्भातील आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. यामध्ये सीबीएस, एफबीएसएल, लिपिड प्रोफाइल, लिव्हर फंक्शन आणि रिनील फंक्शन आदी चाचण्या होतील. सर्व पोलिसांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात येतील. हे संकलन झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय तपासणी पार पडणार आहे