Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांचा प्रताप, पोलिस ठाण्यात जोडप्याला मारहाण

By admin | Updated: November 4, 2015 13:01 IST

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात एका जोडप्याला अमानूष मारहाण करतानाचा मुंबई पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ - मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात एका जोडप्याला अमानूष मारहाण करतानाचा मुंबई पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पिडीत तरुणी पोलिसांना सोडण्याची विनवणी करताना ऐकू येत असून पोलिसांनी या जोडप्याला पोलिस ठाण्यात का आणले होते, मारहाणीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेेले नाही. 

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात २ नोव्हेंबर रोजी एका जोडप्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्या जोडप्याला पोलिसांनी अत्यंत अमानूषपणे मारहाण केली असून हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. या व्हिडीओत पिडीत तरुणी पोलिसांकडे विनवणी करत असल्याचे दिसते. या जोडप्याला पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरले असून मारहाणीमुळे मुलीच्या तोंडातून रक्त आल्याचे या व्हिडीओतील संभाषणावरुन स्पष्ट होते. मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओवर सर्वत्र संताप व्यक्त होत असून पोलिस आयुक्त जावेद अहमद संबंधीतांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.