Join us  

मुंबई पोलिसांना उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करण्याची मुभा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 2:07 PM

पोलिसांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे, अशी माहिती थेट माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

मुंबई : पोलीस कर्मचारी-अधिकारी विनातिकीत लोकलमधून प्रवास करतात. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच दंड पोलीस प्रशासनाकडून दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे अधिकारी वर्तुळातून करण्यात येत होती. मात्र पोलिसांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे, अशी माहिती थेट माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी ही माहिती प्रकाशझोतात आणली आहे.

30 सप्टेंबर 2017 रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या सह रेल्वे बोर्ड आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तदेखील उपस्थित होते. बैठकीत सुरक्षिततेबाबत चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी मुंबई पोलिसांच्या लोकल प्रवासाचा मुद्दा रेल्वे मंत्र्यांपुढे उपस्थित केला. सुरक्षेच्याकारणासत्व मुंबई  पोलिसांना लोकलमधून प्रवास करावा लागतो, यामुळे त्यांना विनातिकीत प्रवास करण्याची मुभा असावी, अशी विनंती आयुक्तांनी रेल्वेमंत्र्यांना केली.

यानुसार 13 ऑक्टोबर रोजी रेल्वे बोर्डाकडून परिपत्रक काढण्यात आले. यात 'वर्दीतील मुंबई पोलिसांना मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा आहे', असे नमूद करण्यात आले आहे. अशी माहिती रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी उघडकीस आणली

 

टॅग्स :मुंबई पोलीसभारतीय रेल्वे