Join us  

मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 11:32 AM

पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मुंबई- महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर येत्या 30 जूनला म्हणजेच आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. पडसलगीकर यांच्याकडे सध्या मुंबईचं आयुक्तपद आहे. पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची 36 वर्षांची निष्कलंक सेवा लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील. त्यानंतर फेब्रुवारीत महासंचालकपददेखील रिक्त होईल.पडसलगीकर यांच्यानंतर ज्येष्ठतेमध्ये असलेले 1985च्या बॅचचे आयपीएस जयस्वाल सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांना परत राज्यात बोलावून मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे. मात्र जयस्वाल त्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :मुंबई पोलीस