Join us

मुंबई विमानतळ जगातील एक नंबर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:54 IST

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले.

मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले. यात चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला आहे. मुंबई विमानतळ सर्वांत व्यस्त विमानतळ ठरले होते.मुंबई, दिल्ली विमानतळाने सिंगापूरला मागे टाकत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळ