Join us

गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होणार; महापालिकेचा दावा

By जयंत होवाळ | Updated: May 27, 2024 21:47 IST

Gokhale bridge : अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: उंचीतील तफावतीमुळे डोकेदुखी बनलेला अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. हे काम वेगाने आणि ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सुरु आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याचे काम वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सुरू आहे. अस्तित्वात असलेल्या सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उंचावून ती नवीन बांधलेल्या गोखले पुलाच्या पातळीला जोडण्याचे काम १४ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याचा आराखडा आयआयटी तसेच व्हीजेटीआय या संस्थांनी तयार केला आहे. 

अशी होणार जोडणी 

सी. डी. बर्फीवाला पुलाच्या शेवटच्या दोन तुळई वेगळ्या करणे. तुळई वेगळी करण्यासाठी पीलर नियंत्रित पद्धतीने व पुलाच्या संरचनेला कोणताही धोका न पोहोचवता तोडणे, गोखले पुलाशी सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी जुळाल्यानंतर तोडलेले जॉइंटचे पुन्हा काँक्रिटींग करणे, नवीन बिअरिंग व जोडणी सांधे (एक्स्पांशन जॉइंट) बसविणे

कामांची प्रगती

बर्फीवाला पुलाची पातळी  उचलण्याचे आणि जुळवण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवीन बेअरिंगसाठी कार्यादेश देवून त्या आणण्यात आल्या. नवीन बिअरींगची चाचणी पूर्ण झाली आहे. आर. सी. सी. काँक्रिट करणे, नवीन बिअरिंग बसविणे हे काम ५ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.  

टॅग्स :मुंबईअंधेरी