मुंबई : जागतिक स्पर्धेत मुंबई शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगात घडणाऱ्या सर्व घटनांचा परिणाम या शहरावर होत असतो. मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना देण्यात येत असलेल्या नागरी सेवा-सुविधा इतर महापालिकेकडून दिल्या जात नाहीत. त्यामुळे नागरी सेवा-सुविधेमध्ये मुंबई महापालिका अव्वल आहे, असे उद्गार बिहार राज्यातील कटिहारचे महापौर विजय सिंग यांनी काढले.शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी कटिहारच्या महापौरांसह १४ नगरसेवकांनी सदिच्छा स्नेहल आंबेकर यांची भेट घेतली. यावेळी विजय सिंग बोलत होते. मुंबईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी उपआयुक्त प्रकाश पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांनी सिंग यांना महापालिकेकडून पुरविण्यात येत असलेले विविध नागरी प्रकल्प, योजना, विविध उपक्रम आदींची माहिती दिली. यावेळी कटिहारच्या शिष्टमंडळाने या नागरी सेवा-सुविधा केवळ मुंबई महापालिकेकडूनच दिल्या जात असल्याचे सांगून या पालिकेकडून खूप शिकण्यासारखे व उपक्रम राबविण्यासारखे प्रकल्प असल्याचे सांगितले. कटिहारच्या शिष्टमंडळाने पालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या वांद्रे येथील मलनि:सारण प्रकल्प व कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमीची पाहणी केली. (प्रतिनिधी)
नागरी सेवा-सुविधेमध्ये मुंबई महापालिका अव्वल
By admin | Updated: May 24, 2015 01:05 IST