Join us  

मुंबई महापालिका म्हणते, ‘दहा वर्षांत ११ लाख झाडांची नोंद’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 1:28 AM

वॉचडॉग फाउंडेशनने केले खंडन; एवढ्या प्रचंड संख्येने झाडांची वाढ कशी काय झाली?

मुंबई : गेल्या दहा वर्षांत ११ लाख झाडांची वाढ झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत विविध विकास प्रकल्प व बांधकामेसुद्धा झपाट्याने वाढली. त्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. मग महापालिकेने जी आकडेवारी सादर केली त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून येत नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.महापालिकेच्या के/पूर्व विभागामध्ये माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती घेतली. यामध्ये पाच वर्षांत महापालिकेने नवीन झाडे लावली. म्हणजे एका वर्षात एक वॉर्डमध्ये सरासरी पाच हजार झाडे पकडली, तर मुंबईमध्ये महानगरपालिकेचे २४ वॉर्ड आहेत. १ लाख २० हजार झाडे गेल्या दशकात लावली असतील, त्याचदरम्यान विविध विकास प्रकल्प व बांधकामांमध्ये लाखो झाडांची तोड करण्यात आली. मग ११ लाख झाडांची वाढ कशी काय झाली? ही आकडेवारी कुठून आणली? ११ लाख झाडांची नोंद ही आकडेवारी पूर्णपणे खोटी आहे, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी दिली.तीन ते चार वर्षांपूर्वी महापालिकेने झाडांची नोंदणी करण्यासाठी जे आदेशपत्र दिले होते त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि बीएआरसी या क्षेत्रातील झाडांची नोंद पात्र ठरणार नाही. झाडांबाबतची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. समजा, दोन वर्षांपूर्वी एका वॉर्डमध्ये २ हजार झाडांची नोंद करण्यात आली. या वर्षीच्याही झाडांची नोंद २ हजारच केली जाते. एक तर झाडांची संख्या कमी होईल किंवा वाढेल. महापालिकेचे अधिकारी झाडे मोजताना कधी दिसले आहेत का, अशी माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली.२०१४ ते २०१९ सालातील झाडांची लागवड : के/पूर्व विभागातील झाडांची आकडेवारीवर्ष नवीन झाडांची संख्या२०१४-१५ ७५२०१५-१६ २६३२०१६-१७ ३५०२०१७-१८ ३०५२०१८-१९ ८५०२०१९-२० ६००एकूण २४४३