Join us  

मंडपांच्या परवानग्या रखडण्यास मुंबई महापालिका जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 3:04 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आॅनलाइन प्रक्रियेदरम्यान खूप अडचणींनासामोरे जावे लागले.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आॅनलाइन प्रक्रियेदरम्यान खूप अडचणींनासामोरे जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे आॅनलाइन अर्ज करताना सर्व्हर सातत्याने बंद पडत असल्याने अनेक मंडळांना परवानगीविना राहावे लागले. आता महापालिका संबंधितांवर कारवाई करत असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवानगी नसताना मंडप उभारल्याच्या कारणात्सव चार मंडळांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. शास्त्रीनगर टॅक्सी स्टॅण्ड गणेशोत्सव मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, शीतलादेवी मंदिर रोड मंडळ आणि न्यू युथ क्लब गणेशोत्सव मंडळ अशी या मंडळांची नावे असून, मंडपांच्या परवानग्या रखडण्यास मुंबई महापालिका जबाबदार आहे, असे म्हणणे लोकप्रतिनिधींनी मांडले आहे.राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यासंदर्भात सांगितले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याच्या परवानग्या आॅनलाइनऐवजी आॅफलाइन द्या, अशी मागणी केली होती.मुळात महापौरांनी हा विषय खरेतर घेणे गरजेचे होते. मुंबईमध्ये साठ ते सत्तर वर्षे जुनी मंडळे आहेत.त्या मंडळांना परवानगीमिळत नसेल तर सण साजरे करायचे नाहीत का? आयुक्तांनाहीसांगितले की, मंडळांना आॅफलाइन प्रक्रिया करण्याची परवानगीद्या. नुकतेच शहरातील काही मंडळांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. यावर कारवाई केलीअसेल तर यास जबाबदार महापालिका आहे. कारण सात ते आठ दिवस सर्व्हर डाऊन होत होते. यास जबाबदार कोण? राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत.>जबाबदार कोण?दुसरीकडे परवानगी नाकारण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या अर्जावर पुनर्विचार करण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. तर मंडपावर कारवाई करण्यात येत असल्याने मंडळे हवालदिल झाली आहेत. कारवाईमुळे कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण, असाही प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव