Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महानगरपालिकेला हवे १.९३ लाख बॉलपेन, ७.५९ लाख लिफाफे; निविदा मंजूर

By जयंत होवाळ | Updated: April 5, 2026 07:25 IST

ही खरेदी पुढील दोन वर्षासाठी आहे

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तब्बल ८० हजार कोटींचा अवाढव्य अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या विविध विभागांना लागणाऱ्या स्टेशनरी आणि अन्य साहित्याची गरजही तशीच अवाढव्य आहे. यात बॉलपेन १ लाख  ९३ हजार ३००, गम बाटल्या १४,१००, मार्कर पेन ३३,८००, नोट बुक  ५४,२००, सेलो टेप २१,६०० तर यात लिफाफ्यांची संख्या  ७ लाख ५९ हजार एवढी प्रचंड आहे. त्याशिवाय १४,४०० ‘गोपनीय लिफाफे’ ही कारभारात लागतात.

महापालिका मुख्यालयासह पालिकेची विविध खाती, विभाग कार्यालयांसाठी स्टेशनरीची गरज असते. प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार मागणी केली जाते आणि त्यानंतर मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत खरेदी होते. यंदाही स्टेशनरी खरेदीसाठी सुमारे ३ कोटी  ८६  लाख ३७ हजार कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. ही खरेदी पुढील दोन वर्षासाठी आहे. खरेदीच्या  यादीवर नजर टाकली असता कोणत्या प्रकारच्या स्टेशनरी, किती प्रमाणात लागतात, याचे चित्र समोर आले आहे.

यंदा स्टेशनरीत ७२ वस्तूंची खरेदी करणार

यंदा स्टेशनरीत ७२ वस्तूंची खरेदी केली जाणार आहे. त्यात सर्वाधिक खरेदी ही विविध प्रकारच्या आणि आकाराच्या लिफाफ्यांची आहे. त्याशिवाय न बुक, बॉक्स फाइल, रबर बंद, पंच मशीन, स्टेपलर, वेटर स्पन्ज डबी, स्टॅम्प पॅड,  प्लॅस्टिकच्या कचरा पेट्या, पंच मशीन, डेस्क कॅलेंडर यांच्याही मागणीनुसार खरेदी केली जाते.

साहित्य     एकूण नग

  • लिफाफे     ७,५९,०००
  • बॉलपेन     १,९३,३०० 
  • नोट बुक     ५४,२००
  • मार्कर पेन     ३३,८००
  • स्टॅपलर     २२,०००
  • सेलो टेप     २१,६००
  • व्हाइटनर     १५,५००
  • गोपनीय लिफाफे     १४,४०० 
  • गम बॉटल     १४,१००
  • ग्ल्यूस्टिक (१५ ग्रॅम)     १२,१००
  • हायलाइटर     ११,४००
  • प्लॅस्टिक पट्टी     ९,८००
  • पेन्सिल बॉक्स     ७,४०० 
  • प्लॅस्टिक ट्रे     ७,३००
  • कार्यक्रम पत्रिका कव्हर     ६,४००
  • कॅल्क्युलेटर     ५,४००
  • शार्पनर (१०चे पाकीट)     ३,१०० 
  • ‘यू’ क्लिप (१० बॉक्सचे पाकीट)      ३,१०० 
  • पेपर वेट     २,६००
English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Municipality Approves Tender for Lakhs of Pens, Envelopes.

Web Summary : Mumbai Municipality approved a ₹3.86 crore tender for stationery. This includes 1.93 lakh ballpens and 7.59 lakh envelopes for various departments over two years. 72 items will be purchased, with envelopes topping the list.
टॅग्स :मुंबई महानगरपालिका