Join us  

मुंबई महानगरपालिका एच-इस्ट वॉर्ड; कॉर्पोरेट कार्यालये, कोट्यवधींच्या झोपड्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:32 AM

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले विद्यापीठाचे कलिना कॅम्पसही येथेच आहे.

सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा, एसआरएसह जिल्हाधिकारी कार्यालये एच-इस्ट वॉर्डमध्ये आहे. बीकेसीमधील भारत नगरसारखी कोट्यवधींचे मोल असणारी झोपडपट्टीही येथे असून, गोळीबार रोडसारखा सातत्याने चर्चेत असणारा पुनर्विकासाचा मुद्दाही याच वॉर्डात आहे. वाकोल्यासारख्या बाजारपेठेने ग्राहकांना भुरळ घातली असतानाच विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले विद्यापीठाचे कलिना कॅम्पसही येथेच आहे.

हद्द-पूर्व-पश्चिम:

पूर्व : मिठी नदी पश्चिम : वांद्रे आणि सांताक्रूझ रेल्वे स्थानकापर्यंत उत्तर : मिलन सब वेपर्यंत दक्षिण : कलानगरपर्यंत 

वॉर्डाचे वैशिष्ट्य:

मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल हे या वॉर्डचे वैशिष्ट्य आहे. रायगड, ठाणे जिल्ह्यांसह देश-विदेशातील विद्यार्थी येथे अभ्यासासह इतर अनेक उपक्रमांसाठी दाखल होत असतात.

 भारत नगर माहीम खाडीची हद्द, सांताक्रूझ विमानतळाची हद्द, भारत नगरसारखी मोठी वस्ती आणि बीकेसीच्या परिसरामुळे हा वॉर्ड चटकन लक्षात येतो.

 सरकारी वसाहती गोळीबार रोड, एअर इंडिया कॉलनी, आग्री पाडा, गावदेवी वाकोला, प्रभात कॉलनी, शास्त्री नगर, सुंदर नगर, निर्मल नगर, खेरेवाडी, भारत नगर, वांद्रे सरकारी वसाहतीसारख्या मोठ्या वसाहती आहेत.

मुख्य समस्या:

 खार सबवे, मिलन सबवे, अशोक नगर, कृष्णा नगर, सीएसटी रोड येथील सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याने स्थानिकांचे हाल होतात.

महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :

विश्वनाथ महाडेश्वर (दिवंगत) :वॉर्ड क्र. ८७ सदानंद परब :     वॉर्ड क्र. ८८ दिनेश कुबल :     वॉर्ड क्र. ८९ तुलिप मिरांडा : वॉर्ड क्र. ९०मोहम्मद शेख :     वॉर्ड क्र. ९१गुलनाथ कुरेशी : वॉर्ड क्र. ९२रोहिणी कांबळे : वॉर्ड क्र. ९३ प्रज्ञा भुतकर :     वॉर्ड क्र. ९४चंद्रशेखर वायंगणकर : वॉर्ड क्र. ९५   

स्वप्नजा क्षीरसागर - सहायक पालिका आयुक्त : कार्यालयात नागरिकांचा सातत्याने येथे वावर असतो. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच विभाग अधिकाधिक स्वच्छ कसा राहील. लोकांचे प्रश्न कसे सोडविले यावर भर दिला जातानाच पायाभूत सेवा सुविधांकडे प्राधान्याने लक्ष पुरविले जाते. नागरी सेवा सुविधांची कमतरता कुठेही जाणवणार नाही हे पाहतानाच विभाग गतिशील करण्यावर पूर्वीपासूनच भर दिला जात आहे.

महत्त्वाची कार्यालये : वांद्रे येथे म्हाडा मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पीएफ, एमएमआरडीए, एफडीए, महारेरा व कार्यालये आहेत.

शैक्षणिक संस्था : वांद्रे पूर्वेकडे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, चेतना महाविद्यालयासह इंडियन एज्युकेशन स्कूलसारख्या शाळाही आहेत.

रुग्णालये : व्ही.एन. देसाई पालिका सर्वसाधारण रुग्णालय, अर्बन हेल्थ सेंटर, एशियन हार्ट हॉस्पिटल, गुरू नानक हॉस्पिटल अशी छोटी-मोठी ३७ हून अधिक रुग्णालये आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिका