Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका आयुक्तांना ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

मुंबई : कोविडकाळात गेली दीड वर्षे मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी संघ भावनेने दिवस-रात्र काम करून मुंबईकरांची सेवा करीत ...

मुंबई : कोविडकाळात गेली दीड वर्षे मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी संघ भावनेने दिवस-रात्र काम करून मुंबईकरांची सेवा करीत आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी लढा सुरू आहे. याच आनुषंगाने ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने आयुक्तांचा विशेष गौरव ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे नुकताच करण्यात आला आहे.

भारतातील प्रशासकीय सेवेत वर्षभरात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना ‘स्पीक इंडिया’ या संस्थेद्वारे दरवर्षी गौरविले जाते. यंदाच्या पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. याअंतर्गत ‘एक्सलन्स इन क्रायसिस मॅनेजमेंट’ या पुरस्काराने पालिका आयुक्तांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार आणि गौरव खऱ्या अर्थाने महापालिकेच्या सर्व कामगार-कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.