मुंबई : मुंबई प्रेस क्लबतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘मुंबई मोमेंट’ या दिनदर्शिकेत ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. खेडेकर यांच्यासह उर्वरित सर्वभाषिक वृत्तपत्रांमधील लक्षवेधी छायाचित्रांचा समावेश दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. ९५० छायाचित्रांपैकी १३ छायाचित्रांची निवड या दिनदर्शिकेसाठी करण्यात आली. प्रीतीश नंदी कम्युनिकेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्र्रीतीश नंदी, आॅग्लिव्ह अॅण्ड मदेरचे सहउपाध्यक्ष पीयूष पांडे आणि द हिंदूच्या मुंबई आवृत्तीचे संपादक सचिन काळबाग यांनी यासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. धावत्या मुंबईचा आढावा घेणारी लक्षवेधी छायाचित्रे या दिनदर्शिकेसाठी निवडण्यात आली.
‘मुंबई मोमेंट’मध्ये ‘लोकमत’च्या छायाचित्राला मान
By admin | Updated: December 5, 2015 09:08 IST