Join us  

मुंबईतील म्हाडाच्या लाखो रहिवाश्यांना मिळणार महानगर पाईप गॅसची जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 1:45 PM

- मनोहर कुंभेजकरमुंबई- मुंबईतील म्हाडाच्या लाखो रहिवाश्यांना महानगर पाईप गॅसची जोडणी मिळणार आहे.उद्या रविवार दि,8 रोजी या गॅस जोडणीचा शुभारंभ सायंकाळी 6 वाजता बोरीवली पश्चिम गोराई आणि  कांदिवली पश्चिम चारकोप येथे ऊत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते होणार असून यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री विनोद तावडे,चारकोपचे भाजपा आमदार योगेश सागर आणि येथील नागरिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.याबाबतीत अधिक माहिती देतांना खासदार शेट्टी यांनी सांगितले की,आपल्या गेल्या चार वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून याचा फायदा मुंबईतील म्हाडाच्या चाळी,इमारती, आणि म्हाडा बंगलो धारकांना अश्या म्हाडा च्या लाखो रहिवाश्यांना होणार असून त्यांना घरोघरी महानगर पाईप गॅसची जोडणी मिळणार आहे.त्यामुळे विशेषकरून तमाम महिला वर्गाला या पाईप गॅस जोडणीचा मोठा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर घरी संपल्या नंतर आता घरी लवकर दुसरा गॅस डिलेंडर कधी येईल याची वाट बघावी लागणार नाही.याप्रकरणी आपण गेली चार वर्षे आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व महानगर गॅस निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला होता.मंत्री महोदयांनी आदेश देऊन सुद्धा महानगर गॅस निगम गॅसची जोडणी देत नव्हते.त्यामुळे आपण हा विषय पुन्हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे मांडू व संसंदेत देखिल तुमच्या विरोधात आवाज उठवू असा जणू इशाराच त्यांना दिला.अखेर गेल्या 1 जानेवारी रोजी महानगर गॅस कनेक्शन देण्याचे कंपनीने कळवले,त्यामुळे म्हाडाच्या लाखो नागरिकांना आता महानगर पाईप गॅसचा मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेवटी दिली.