Join us  

मुंबईकरांनो रविवारी प्रवास करताय? तिन्ही मार्गांवर असणार ब्लॉक, वाचा वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 10:17 AM

रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे :

कुठे? - सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धिम्या मार्गावर

कधी? - सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ पर्यंत

परिणाम - या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकात थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाउन मार्गावर वळवण्यात येतील. तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ट्रान्स हार्बर :

कुठे? - ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर

कधी? - सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत

परिणाम - ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

पश्चिम रेल्वे :

कुठे? - अंधेरी ते बोरीवली अप- डाऊन जलद मार्गावर

कधी? - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम - या ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल अंधेरी ते बोरीवली दरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तसेच अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत. याशिवाय हार्बर मार्गावरील काही बोरीवली आणि अंधेरी लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे