Join us  

मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा; रविवारी होळी आणि लोकलचा मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:21 AM

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत आहे, तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:१८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल थांबतील. नंतर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

१५ मिनिटे उशिराने धावतील. ठाणे येथून सकाळी १०:५८ ते दुपारी ३:५९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. १५ मिनिटे उशिरा धावतील.

हार्बर मार्ग-

१)  सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

२) डाउन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी १०:१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३:४४ वाजता सुटेल.  

३) अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०:०५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटेल.

पश्चिम रेल्वे :

पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव -

१) डाउन धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा लोकल आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी ९:५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल दुपारी ३:३२ वाजता सुटेल.

२) अप धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल आहे. ठाणे येथून ती सकाळी १०:२७  वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल आहे. ठाणे येथून ती दुपारी ४:०३  वाजता सुटेल.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेहार्बर रेल्वे