Join us  

रविवारी तिन्ही मार्गांवर ‘ब्लॉक’मुळे ‘मेगा हाल’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:05 AM

रविवारी (दि.११) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (दि.११) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे

कुठे- माटुंगा- ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम- या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळविण्यात येईल तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

पश्चिम रेल्वे : 

कुठे- सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम - या ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल   सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तसेच अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत. याशिवाय हार्बर मार्गावरील काही बोरीवली आणि अंधेरी लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे :

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम - ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी  येथून  पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. 

 पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरीता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द 

 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन धावतील.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेहार्बर रेल्वे