Join us  

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:48 AM

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर घरात बसून न राहता त्या स्वत: पालिका रुग्णालय व विभाग कार्यालय आदी ठिकाणी पाहणी करीत आहेत.

मुंबई : महापौर किशोर पेडणेकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्नी रोड येथील खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर घरात बसून न राहता त्या स्वत: पालिका रुग्णालय व विभाग कार्यालय आदी ठिकाणी पाहणी करीत आहेत. त्याचबरोबर पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक आरोग्य सुविधांबाबत सूचना देणे, कार्यवाही करणे आणि पाठपुरावा करण्याचे कामही महापौर करीत असतात. कोरोना हॉटस्पॉटमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला आहे. एप्रिल महिन्यात महापौरांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आली होती. मात्र खबरदारी म्हणून त्या १४ दिवस होम क्वारंटाईन होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले कार्य सुरू ठेवले होते. दोन दिवसांपासून त्यांना ताप येणे व युरिनचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने उपचारासाठी तीन ते चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तसेच खबरदारी म्हणून त्यांची कोरोना चाचणीही केली जाणार असल्याचे समजते. 

टॅग्स :मुंबईमहापौरशिवसेना