Join us  

Mumbai Train Update : बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:49 AM

हार्बर रेल्वेची वाहतूक बुधवारी (23 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देहार्बर रेल्वेची वाहतूक बुधवारी (23 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी वाशी लोकल रद्द करण्यात आली आहे.

मुंबई - हार्बर रेल्वेची वाहतूक बुधवारी (23 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी वाशी लोकल रद्द करण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी सोमवारी (14 जानेवारी) हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. 

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबईलोकलहार्बर रेल्वे