Join us

मुंबई कुडकुडली

By admin | Updated: January 21, 2016 04:08 IST

हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्याने पुन्हा एकदा जोर पकडला असून, त्यामुळे मुंबईसह राज्यही कुडकुडले.

मुंबई : हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्याने पुन्हा एकदा जोर पकडला असून, त्यामुळे मुंबईसह राज्यही कुडकुडले. प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.८ अंश तर मुंबईचे किमान तापमान १२.६ अंश नोंदविण्यात आले. पुढील ४८ तासांसाठी वातावरण असेच थंड राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)अलिबाग १४, रत्नागिरी १५.१, पुणे ८.२, अहमदनगर ७.६, जळगाव १०, महाबळेश्वर १०.५, मालेगाव ९.६, नाशिक ५.८, सांगली १५.४, सातारा ११, सोलापूर १६.३, उस्मानाबाद १२, औरंगाबाद १०.६, परभणी १२.२, नांदेड १३, अकोला ११.५, अमरावती ११.२, बुलडाणा १२.६, चंद्रपूर १६.४, गोंदिया १३, नागपूर १३.४, वाशिम १४.२, वर्धा १२.८, यवतमाळ १३राज्यासाठी अंदाज२३ जानेवारी : दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.२४ जानेवारी : दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.