Join us

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आखाती देश, युराेपातील प्रवासी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 02:25 IST

अमेरिकेतूनही वाढ : अरब अमिरातीच्या कराराचा परिणाम

मुंबई : अनलाॅकनंतर टप्प्याटप्प्याने विमानसेवांना परवानगी देण्यात आली. जूननंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सर्वाधिक ६३ टक्के, युराेपमधून १८ टक्के आणि उत्तर अमेरिकेतून १० टक्के वाढ झाली आहे. हे आकडे ३१ ऑक्टाेबरपर्यंतचे असून, या महिन्यात यामध्ये आणखी वाढ हाेण्याची अपेक्षा आहे. 

मुंबई-दुबई मार्गावर प्रवाशांची नाेंद झाली आहे. त्यानंतर मुंबई-शारजा आणि मुंबई-अबूधाबी या मार्गाचा क्रमांक लागताे. संयुक्त अरब अमिरातीसाेबत करारामुळे ही वाढ झाली आहे. या करारामुळे सुमारे १ लाख २३ हजार प्रवासी अमिरातीला गेले, तर दुबईच्या मार्गावर १ लाख ८ हजार २५० प्रवाशांनी प्रवास केला.

 

टॅग्स :मुंबईविमानतळ