Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सचा प्रवीण कुमारशी करार

By admin | Updated: May 9, 2014 00:24 IST

मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ आणि अनुभवी गोलंदाज जायबंदी झाल्यामुळे त्याची उणीव भरुन काढण्यासाठी मुंबई संघाने जलद गोलंदाज प्रवीण कुमार याला करारबद्ध केले आहे.

 मुंबई: मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ आणि अनुभवी गोलंदाज जायबंदी झाल्यामुळे त्याची उणीव भरुन काढण्यासाठी मुंबई संघाने जलद गोलंदाज प्रवीण कुमार याला करारबद्ध केले आहे. मुंबईकडून सहा सामने खेळल्यानंतर जहीरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने आयपीएलाच्या सातव्या पर्वातून तो आऊट झाला होता. प्रवीण शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळल्या जाणार्‍या सामन्याआधी मुंबई संघात दाखल होईल. फेब्रुवारीत झालेल्या सातव्या पर्वातील लिलावात प्रवीणला भाव मिळाला नव्हता. त्याआधी गतवर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबचा नियमित खेळाडू म्हणून त्याने १५ सामन्यात १२ गडी बाद केले. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने उत्तर प्रदेशसाठी सहा सामन्यात आठ गडी बाद केले. प्रवीणला फिटनेस आणि बेशिस्तीच्या कारणांवरुन भारतीय संघाबाहेर करण्यात आले. त्याआधी २०१२-१३ च्या मोसमातील सर्वच सामने दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता व जेव्हा परतला त्याचवेळी २०१३ च्या कार्पोरेट चषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंला रागाने लालबूंद अवस्थेत दमदाटी केल्याबद्दल त्याच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. २०१३-१४ च्या रणजी मोसमातही तो संघाबाहेर होता. त्याआधी २००८-२०१० या कालावधीत प्रवीण कुमार हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा सदस्य होता पण २०११ च्या लिलावात किंग्ज पंजाबने त्याला खरेदी घेतले होते. (वृत्तसंस्था)