Join us

Mumbai: मुंबईतील मनपा शाळेमधील पहिल्या अभ्यासिकेचे उदघाटन  

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 8, 2023 15:37 IST

Mumbai: आज अंधेरी (पूर्व),गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथील नित्यानंद मनपा शाळा, गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथे पार पडले.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - आज अंधेरी (पूर्व),गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथील नित्यानंद मनपा शाळा, गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथे पार पडले.

या प्रसंगी आमदार अँड.पराग अळवणी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष माननीय आचार्य पवन त्रिपाठी भाजपा जिल्हा महामंत्री  मुरजी पटेल, वार्ड 84 चे माजी नगरसेवक अभिजित सामंत तसेच के (पूर्व) मनपा सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू  मनपा शिक्षण अधिकारी राजेश कनकल, राजू तडवी, ममता राव, निसार खान आणि नित्यानंद मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता वजिरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

भाजप नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अभिजित सामंत यांनी गेली काही वर्षे मनपा शाळेतील किमान 2  वर्गखोल्या सायंकाळी व सुट्टीच्या दिवशी विभागातील गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता उपलब्ध करून द्याव्यात याकरिता प्रयत्नशील होते आणि तत्कालीन मनपा आयुक्तांशी पाठपुरावा केला होता.

मागील महिन्यात  मंगलप्रभात लोढा यांच्या  मनपा मुख्यालयाच्या नागरी तक्रार निवारण कक्षातील भेटीत हा विषय अभिजित सामंत यांनी मंत्री महोदयांकडे  विशद केला व त्यांनी हा विषय मनपा आयुक्तांशी बोलून त्याबाबतीत निर्णय घेण्याचे सांगितले. आणि आयुक्तांनी त्वरित निर्णय घेऊन संपूर्ण मुंबईतील मनपा शाळांत अभ्यासिका चालू करण्याचे मान्य केले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या प्रकल्पातील मुंबईतील पहिली अभ्यासिका विलेपार्ले - अंधेरी विभाग वॉर्ड 84 येथील नित्यानंद मनपा शाळेत सुरु झाली आहे. अशा प्रकारे टप्याटप्याने मुंबईतील प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे अभ्यासिका चालू करण्याचे मंत्री लोढा यांनी सूचना केली .

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढा