Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत पाणीकपात अटळ?

By admin | Updated: August 25, 2015 05:30 IST

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आता सात तलावांत केवळ ६५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी, जलनियोजनाचा विचार करता बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून १० टक्के पाणीकपातीच्या घोषणेची शक्यता आहे.मुंबईला दरदिवशी ३ हजार ७७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा व्हावा म्हणून १ आॅक्टोबर रोजी सात तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक असते. पावसाअभावी तलावांतील जलसाठा खालावत असून, २४ आॅगस्ट रोजी सातही तलावांतील एकूण जलसाठा ९ लाख ३९ हजार ४५० दशलक्ष लीटर एवढा आहे. (प्रतिनिधी)