Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: गोकुळधाम, धीरज व्हॅली समोरील पालिकेने रोखला ना विकास क्षेत्रातील भराव

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 8, 2024 17:51 IST

Mumbai News: गोरेगाव ( पूर्व ),गोकुळधाम, धीरज व्हॅली समोरील ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जागेवर गेल्या अनेक दिवसापासून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात माती भराव व काम सुरू होते. या संदर्भात प्रभाग क्रमांक 52 च्या माजी नगरसेविका  प्रिति सातम यांनी महापालिका  पी दक्षिण विभागाला तक्रार  करून कारवाईची मागणी केली होती.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - गोरेगाव ( पूर्व ),गोकुळधाम, धीरज व्हॅली समोरील ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जागेवर गेल्या अनेक दिवसापासून अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात माती भराव व काम सुरू होते. या संदर्भात प्रभाग क्रमांक 52 च्या माजी नगरसेविका  प्रिति सातम यांनी महापालिका  पी दक्षिण विभागाला तक्रार  करून कारवाईची मागणी केली होती.

यासंदर्भात पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त  संजय  जाधव  यांनी आज स्वतः जागेवर येऊन त्वरित अनधिकृतपणे येथील ना विकास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या माती भराव व कामाची पाहाणी केली.

पालिका प्रशासनाने सदर भरणीचे काम थांबविले आले असून तसेच कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यावेळी पोलीस अधिकारी,महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई