Join us

मुंबईत डॉक्टर-रु ग्ण जागरु कता रॅली

By admin | Updated: September 29, 2014 23:19 IST

मुंबईत डॉक्टर-रु ग्ण जागरु कता रॅली

मुंबईत डॉक्टर-रु ग्ण जागरु कता रॅली
मुंबई : जे. जे. हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सेस, अन्य कर्मचारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधील नागरिकांनी जागतिक हृदय दिन साजरा केला.
हृदयाच्या प्रतिबंधात्मक देखभालीला प्रोत्साहन देण्यासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये आयोजित जागरुकता रॅलीमध्ये सुमारे ५०० नागरिक- डॉक्टर, नर्सेस, अन्य कर्मचारी, रुग्ण आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील नागरिक सहभागी झाले होते. जे. जे. हॉस्पिटलच्या कार्डिऑलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एन. ओ. बन्सल यावेळी उपस्थित होते. या रॅलीनंतर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदाब, ग्लुकोज, लिपिड प्रोफाइल, ईसीजी, २ डी एको आणि स्ट्रेस टेस्ट यांसारख्या चाचण्या मोफत करुन देण्यात आल्या.