Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विकास आराखड्यास मार्चपूर्वी मंजुरी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:26 IST

मुंबई शहराच्या विकास आराखड्याला या ३१ मार्चपूर्वी मंजुरी देऊन संबंधित सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई शहराच्या विकास आराखड्याला या ३१ मार्चपूर्वी मंजुरी देऊन संबंधित सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेने दीड महिन्यापूर्वी राज्य सरकारला विकास आराखडा सादर केलेला आहे. महापालिकेने तो सादर केल्यानंतर दीड वर्षाच्या आत राज्य सरकारने त्यास मंजुरी द्यावी, असे बंधन असते. आम्ही इतका वेळ लावणार नाही. येत्या काही दिवसांतच मंजुरी देऊन ३१ मार्चपूर्वी सर्व कार्यवाही पूर्ण केली जाईल.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीस