Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करा, आमदार अस्लम शेख यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 18, 2023 14:12 IST

Mumbai: मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि, १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह काल सोमवारी दुपारपर्यंत सापडले.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई  - मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले ५ युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवार दि, १६ जुलै रोजी घडली. यापैकी २ तरुणांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले तर तीन युवकांचे मृतदेह काल सोमवारी दुपारपर्यंत सापडले.

नजीकच्या काळात घडलेल्या दुर्घटनांचा विचार करता तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत अशी मागणी माजी मंत्री व मालाड-पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :मुंबई