Join us  

ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले पाच दिवस सुट्टीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 6:08 AM

मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले १३ ते १७ एप्रिल असे पाच दिवस सुट्टीवर जाणार आहेत.

मुंबई :

मुंबईकर नोकरदारांना वेळेवर डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेबाले १३ ते १७ एप्रिल असे पाच दिवस सुट्टीवर जाणार आहेत. ग्रामदैवत आणि कुलदैवतांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते आपल्या मूळ गावी रवाना होणार असल्याने या काळात त्यांची सेवा खंडित राहील.

मुंबईचे डबेवाले हे मूळचे पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने खेड (राजगुरूनगर) मावळ या तालुक्यातून व काहीअंशी मूळशी, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील आहेत.  येथील यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. आता निर्बंधमुक्तीनंतर ही पहिली यात्रा असल्यामुळे त्यात सहभागी होण्यासाठी डबेवाला मूळ गावी जाणार आहेत. त्यामुळे पाच दिवस त्यांची सेवा बंद राहणार आहे.

या कालावधीत दोन शासकीय सुट्ट्या आणि शनिवार, रविवारची सुटी येत आहे. त्यामुळे बहुतांश आस्थापनांमधील डबे बंद असतील. परीक्षा कालावधी असल्यामुळे शाळांचे डबेही बंदच आहेत. त्यामुळे या सुट्टीचा पगार कापू नये, असे आवाहन ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने ग्राहकांना केले आहे.

टॅग्स :मुंबई डबेवालेमुंबई