Join us

Mumbai Corona Updates: मुंबईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 6:07 PM

Mumbai Corona Updates: मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन निर्बंध कडक करण्याच्या तयारीत आहे.

मुंबई :मुंबईत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन निर्बंध कडक करण्याच्या तयारीत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीती पसरत आहे. त्यात मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईत कडक लॉकडाउन  करण्याची मागणी केले आहे.

आधीच कोरोनामुळे राज्यभरात मोठे आर्थीक नुकसान  झाले आहे. त्यातच पहीली व दुसरी लाट आल्यामुळे दोन वेळा कडक लॉकडाऊन केले गेले. यामुळे राज्यात सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान झाले. त्यात आता पुन्हा तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. त्यातच प्रशासन कडक निर्बंध करण्याच्या तयारीत असताना कठोर निर्बंध न करता , थेट लॉकडाउन करा तरच परिस्थिती आवाक्यात येईल असं इंडिया  अगेन्स करप्शनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही मागणी केली आहे. ही मागणी करत त्यांनी लावून केल्यानंतर सर्वच क्षेत्रातील जनतेला आर्थिक मदत करा अशी देखील मागणी केली आहे. याविषयी पत्रव्यवहार मुंबईचे जिल्हाधिकारी,पालकमंत्री आरोग्यमंत्री यांना देखील करण्यात आला आहे.

राज्यात कठोर निर्बंध किंवा लॉकडाउन करण्याविषयी आमचा मानस नाही असा प्रशासनाने यापूर्वीच सांगितलेला आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने केंद्र सरकार सूचना करेल यानुसार आम्ही निर्णय घेऊ असा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते करत असलेल्या मागणीकडे प्रशासन कशा रितीने पुढील काळात काय निर्णय घेत हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई