Join us  

...तर मुंबईत आजपासून दररोज 2000 रुग्ण सापडतील, आदित्‍य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 6:02 PM

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थिती आणि तयारींचा आढावा घेतला.

मुंबई: महाराष्ट्र सरकारमधील पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईती वाढत्या कोरोना संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. 'ज्याप्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, ती पाहता मुंबईत आजपासून रोज 2000 रुग्ण सापडू शकतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, कोरोना रुग्णांच्या अचानक वाढलेल्या आकड्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

मंगळवारी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1377 वर पोहोचली असून, एका दिवसापूर्वीचा आकडा 809 होता. सोमवारच्या तुलनेत जवळपास 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

घाबरु नका, काळजी घ्याबैठकीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, 'मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ पाहता आम्ही बैठक घेऊन परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी लसीकरण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की घाबरून जण्याची गरज नाही, फक्त कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

नववर्षाच्या आयोजनांवर बंदीते म्हणाले, 'आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा केली. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. पण, खबरदारी म्हणून, मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे,'असेही ते म्हणाले.    

टॅग्स :आदित्य ठाकरेकोरोना वायरस बातम्याओमायक्रॉनमुंबई