Join us  

मुंबई किनारी फ्लेमिंगोंची संख्या भारी! नव्या वर्षात सव्वा लाख पाहुण्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 7:28 AM

मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांची गर्दी अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांची मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे.

मुंबई  - मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांची गर्दी अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांची मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे. जानेवारी महिन्यात मुंबईच्या किनाºयावर आगमन झालेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या १ लाख २१ हजारांच्या घरात गेली आहे.शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानचा ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे शेकडो तिवरांची कत्तल करण्यात आली. सागरी विकास प्रकल्पांमुळे मुंबईमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी होईल, अशी भीती पक्षीप्रेमींनी वाटत होती, परंतु बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने केलेल्या फ्लेमिंगो गणनेनुसार पक्ष्यांची संख्या वाढत आहे. जानेवारीत १ लाख २१ हजार ९०० फ्लेमिंगोंची नोंद बीएनएचएसने केलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या गणनेतून समोर आली आहे.मुंबईतील आसपासच्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा व्यापक अभ्यास हा प्रथमच करण्यात आला. तसेच ट्रान्स हार्बर लिंक रोड (शिवडी-न्हावाशेवा) प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांवर परिमाण होत आहे का? याचा अभ्यास बीएनएचएस ही संस्था करत आहे.पर्यावरणशास्त्र, पक्ष्यांसाठी पूरक आहार, मानवाचा हस्तक्षेप याचा अभ्यास हा या पक्षीगणनेचा उद्देश होता. अभ्यासादरम्यान मुंबई परिसरातील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाची नोंद करण्यात आली. प्रवासी पक्ष्यांना समजून घेण्यासाठी दीर्घकालीन अभ्यासाची गरज आहे. भविष्यात पक्ष्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभ्यासक व बीएनएचएसचे सहायक संचालक राहुल खोत यांनी दिली....तरच प्रदूषणमुक्तअधिवास उपलब्ध होईल... शहरात विकासाची कामे करत असताना, आपल्याला अधिक जबाबदार आणि संवेदनशील असणे आवश्यक आहे. प्रदूषित समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून फ्लेमिंगो पक्षी आणि इतर स्थलांतरित पक्ष्यांना प्रदूषणमुक्त अधिवास उपलब्ध होऊ शकेल.- डॉ. दीपक आपटे, संचालक, बीएनएचएस\अशी केली गणनाठाणे खाडी (विटावा-शिवडी ते विटावा-जेएनपीटी) या दोन्ही किनाºयांवर एक किलोमीटरचा भाग सर्वेक्षणासाठी निवडण्यात आला. छोटे फ्लेमिंगो आणि मोठे फ्लेमिंगो पक्षी मोजण्यासाठी संशोधक व सहायकांचे अनेक गट तयार करण्यात आले. या वेळी बोटीतून विविध ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंदणी करण्यात आली. हे सर्वेक्षण सलग तीन दिवस सुरू होते.

टॅग्स :मुंबई