Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई भाजपचा ‘ताे’ पदाधिकारी बांगलादेशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:07 IST

- गृहमंत्री अनिल देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल ...

- गृहमंत्री अनिल देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

शेखने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली होती. या संदर्भात पोलिसांनी चौकशीदरम्यान त्यांच्या घरात पश्चिम बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा-२४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवासी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा-नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखल सापडला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतीत जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याच्या नावाचा कोणताही रहिवासी दाखला देण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नादिया पश्चिम बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता रुबेलकडे असलेला दाखला हा दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी रुबेलच्या घरात सापडलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याचे जिल्हा शाळा निरीक्षक ए. स. जि. नादिया, राज्य प. बंगाल येथील रेकॉर्ड तपासून पाहिले असता या दाखल्यामध्ये नमूद केलेली बोलगंडा आदर्श हायस्कूल, बोलगंडा जि. नादिया ही शाळाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. याच सर्व खोट्या कागदपत्रांच्या आधारावर त्याने आधारकार्ड व पॅनकार्ड काढल्याचे तपासात समोर आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

........................