Join us  

Diwali 2018 : भाऊबीजेला बँका सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 11:20 AM

भाऊबीजेदिवशी राष्ट्रीयीकृत, सहकारी, आंतरराष्ट्रीय बँका सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्ल्पॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

मुंबई -  भाऊबीजेदिवशी राष्ट्रीयीकृत, सहकारी, आंतरराष्ट्रीय बँका सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्ल्पॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. दिवाळीत सलग पाच दिवस बँक बंद राहतील, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. 7 आणि 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडव्याच्या सार्वजनिक सुट्यांमुळे बंद राहतील तर 9 नोव्हेंबरला भाऊबीजेदिवशी बँकांचे सर्व व्यवहार सुरू राहतील, असेही ते म्हणाले. 

(दिवाळीत सोनं खरेदी करताय? लॉकरऐवजी 'इथं' ठेवा अन् जास्त व्याज मिळवा)

7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान बँका बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. बुधवारी 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा, शुक्रवारी 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज असल्याने बँका बंद असल्याचे म्हटले जात होते. तसेच 10 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 11 नोव्हेंबरला रविवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. पण भाऊबीजेला बँका सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

6 नोव्हेंबर - नरक चतुर्दशी

7 नोव्हेंबर - दीपावली, लक्ष्मीपूजन

8 नोव्हेंबर - पाडवा, बलीप्रतिपदा

9 नोव्हेंबर - भाऊबीज 

 

 

टॅग्स :बँकदिवाळी