Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:27 IST

गोरेगाव पोलीस ठाण्यात फिरोजविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत होते. त्याच दरम्यान...

मुंबई : पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीने पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. फिरोज उर्फ चिंधी शाब्बीर खान असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यात फिरोजविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी त्याच्याकडे चौकशी करत होते. त्याच दरम्यान, त्याने तेथील काचेच्या खिडकीवर डोके आपटले आणि येथेच जीव देऊन पोलिसांना अडकविण्याची धमकी दिली. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसआत्महत्या