Join us  

Honest cities in the world: जगातील प्रामाणिक शहरांमध्ये मुंबई दुसरी; आनंद महिंद्रा यांनी शेअर केली ही गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:00 PM

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतात... त्यांच्या ट्विटर हँडलवर आपल्याला रोज काहीना काही नवीन पाहायला, वाचायला मिळते. त्यांच्या पोस्ट बऱ्याच उपयोगीही असतात आणि अशीच एक पोस्ट त्यांनी बुधवारी शेअर केली. ती वाचून मुंबईकर म्हणून तुम्हाला तर अभिमान वाटेलच, शिवाय भारताची मानही अभिमानानं ताठ होईल. जगात सर्वात प्रामाणिक शहर म्हणून मुंबईनं दुसरे स्थान (Mumbai Second Honest City in World) पटकावले आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेलं ट्विट तुफान व्हायरल झालं आहे.   रिडर्स डाईजेस्ट यांनी सोशल मीडियावरून सर्व्हे करत जगातील सर्वात प्रामाणिक शहरांची माहिती घेतली. तेथील लोकांचे विचार व मानसिकता कशी आहे?; या आधारावर The Wallet Experiment या कॅम्पेनची सुरुवात केली. या कॅम्पेनच्या माध्यमातून जगातील १६ मोठ्या शहरांमध्ये १९२ मुद्दाम वॉलेट ( पॉकिट) हरवण्यात आले. यानुसार प्रत्येक शहरात १२ पॉकिट्स मुद्दाम हरवण्यात आली. या पॉकेट्समध्ये जवळपास ५० डॉलरच्या हिशोबानं पैसे ठेवण्यात आले. त्याच्यासोबत पॉकेटात संबंधित व्यक्तीचे नाव, कुटुंबीयांची माहिती, बिझनस कार्ड आणि कार्यालयाचा पत्ता ठेवण्यात आला. त्यानंतर कोणत्या शहरात किती पॉकिट्स सापडले याचा अभ्यास करून निकाल समोर ठेवण्यात आला.  

या कॅम्पेनमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईनं दुसरे स्थान पटकावले. १२ पैकी ९ पॉकिट्स परत मिळाले, तर फिनलँडच्या हेलिस्की शहरानं अव्वल स्थान पटकावले. तिथे १२ पैकी ११ पॉकिट्स परत मिळाली. Erik Solheim या युजरनं हा डाटा पोस्ट केला आणि आनंद महिंद्रा यांनी त्याला रिट्विट करून त्यांचे मत मांडले. ''या निकालाचे आश्चर्य अजिबात वाटले नाही, परंतु प्रयोगाचा निकाल पाहून आनंद नक्कीच झाला. जर तुम्ही प्रत्येक देशाच्या उत्पन्नाच्या सापेक्ष पातळीवर विचार केला तर मुंबईचा परिणाम आणखी प्रभावी आहे,''असे ट्विट महिंद्रा यांनी केले.   

टॅग्स :मुंबईआनंद महिंद्रा