Join us  

मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वाचले हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:45 AM

तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्याने जीव वाचला

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ६२ वर्षीय प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.गुुरुवारी पत्नीचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी सदर इसम त्यांच्या मुलीसमवेत आले होते. दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सदर इसमाने केल्यावर विमानतळावरील तत्काळ वैद्यकीय मदत देणाºया पथकाने त्यांची तपासणी केली व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे विविध विकार असल्याने अधिक उपचारांसाठी विमानतळाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने ते आता धोक्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले.