Join us  

मुंबई विमानतळाचा नवा रेकॉर्ड, 24 तासांत 969 विमानांनी केलं टेक ऑफ व लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 11:09 AM

मुंबई- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानं स्वतःच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे.

मुंबई- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानं स्वतःच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे. मुंबई विमानतळावरील रनवेवरून शुक्रवारी 24 तासांत 969 विमानांनी टेक ऑफ आणि लँडिंग केलं आहे. याआधी मुंबई विमानतळाच्या रनवेवरून 935 टेक ऑफ आणि लँडिंग यशस्वीपणे पार पाडले होते.छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑथॉरिटीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती उघड केली आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास मुंबई विमानतळवर एकच रनवे उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक विमानांना या एकाच रनवेवरून उड्डाण व लँडिंग करावं लागतं. मुंबईत जवळपास 900पेक्षा अधिक विमानांची दररोज ये-जा असते. लवकरच मुंबई विमानतळ टेक ऑप आणि लँडिंगच्या बाबतीत 1000चा आकडा ओलांडेल, असं वक्तव्य एमआयएएलच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. न्यूयॉर्क, लंडन, अमेरिका, दुबई व दिल्ली यांसारख्या मोठ्या विमानतळांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक रनवे उपलब्ध आहेत. आणि त्या विमानतळांच्या रनवेवरून एकाच वेळी विमानांचं उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मुंबई विमानतळावरही दोन रनवे आहेत, परंतु एका वेळी एकच रनवे सुरू ठेवण्यात येतो. गॅटविक हे जगातील एकमेव असे विमानतळ आहे जिथे नियमितपणे तासाला 50हून अधिक विमानं टेक ऑफ आणि लँडिंग करतात. इतर विमानतळांवर 42 किंवा त्याहून कमी विमानांचं लँडिंग अथवा उड्डाण होतं. गॅटविकनंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विमानतळ आहे जेथे 50हून अधिक विमान टेक ऑफ किंवा लँडिंग करतात.

टॅग्स :मुंबईविमानतळ