मुंबई : मुंबईतील खासगी प्राथमिक शाळांमध्ये आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागा येत्या सप्टेंबरअखेर्पयत भरल्या जातील, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल डी़ज़े खंबाटा यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली़
ते म्हणाले, याची माहिती माध्यमांद्वारे दिली जाईल़ यासाठी ऑगस्टअखेर्पयत अर्ज मागवले जातील व त्यानंतर पुढील प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल़ न्या़ अनुप मोहता यांच्या खंडपीठाला ही माहिती देण्यात आली़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तीन आठवडय़ांसाठी तहकूब केली़ त्याच वेळी या राखीव जागा न भरणा:या मुंबईतील 11 शाळांना नोटिसा देण्यात आल्याचे महापालिकेने न्यायालयाला सांगितल़े याप्रकरणी अनुदानित शिक्षा बचाव समितीचे सुधीर परांजपे यांनी अॅड़ ओ़पी़ सिंग यांच्यामार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आह़े आरटीई कायद्यानुसार खासगी प्राथमिक शाळांच्या प्रवेशात दुर्बल घटकांसाठी विनाअनुदानित व अल्पसंख्याक शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवणो बंधनकारक असून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े यंदा पालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईतील 265 शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली़ या प्रक्रियेसाठी 8223 जागा उपलब्ध होत्या.या जागांसाठी 8777 अर्ज आल़े यामधील 3352 जण प्रवेशासाठी पात्र ठरले. यामधील 1क्67 जणांना प्रवेश मिळाला आह़े (प्रतिनिधी)