Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ९४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शुक्रवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.१२ टक्के एवढा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ४९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.१२ टक्के एवढा आहे. दिवसभरात ५८९ रुग्ण बरे झाले असून, आठ रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झाली. आतापर्यंत ९४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११ हजार ३३४ एवढा आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५७ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार सध्या पाच हजार ४१७ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत दोन लाख ९० हजार ४०० रुग्ण बरे झाले. शुक्रवारी मृत्यू झालेल्या आठ कोरोना रुग्णांपैकी सर्वच रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी पाच रुग्ण पुरुष आणि तीन महिला होत्या. सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते, तर दोन रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होते. एकूण काेराेनाबाधितांचा आकडा तीन लाख आठ हजार ५७ एवढा आहे. आतापर्यंत २७ लाख ७३ हजार १६६ चाचण्या करण्यात आल्या.

........................