Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ७५८ रुग्ण, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शनिवारी काेराेनाच्या ७५८ रुग्णांचे निदान झाले असून १८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शनिवारी काेराेनाच्या ७५८ रुग्णांचे निदान झाले असून १८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार २६० वर पोहोचली असून मृतांचा आकडा १० हजार ८८९ झाला आहे.

मुंबईत दिवसभरात ४०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २ लाख ५९ हजार ५३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत सध्या १३ हजार २६२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुपटीचा कालावधी २५७ दिवसांवर पोहोचला आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३ हजार ८८० सहवासितांचा शोध घेतला आहे. दिवसभरात मृत झालेल्या १८ रुग्णांपैकी १४ जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ११ पुरुष तर ७ महिला होत्या.